India Angel Fund invests in Mental Wellness Startup IPHM Services round led by Monaliesa Sarkar Jyoti Tiwari Koel Dutta Sabana Khatoon Dr. Vikaas Grover and Rahul Narvekar

WHY US

Partner with us for Press release distribution and get best in class service, guaranteed postings on tier 1 media and maximum reach

इंडिया एंजल फंडने मेंटल वेलनेस स्टार्टअप IPHM सर्व्हिसेसमध्ये गुंतवणूक केली, राऊंड प्रमुख-मोनालिसा सरकार, ज्योती तिवारी, कोयल दत्ता, सबाना खातून, डॉ.विकास ग्रोव्हर आणि राहुल नार्वेकर

  • Friday, August 7, 2020 6:00PM IST (12:30PM GMT)
 
Mumbai, Maharashtra, India:  
आयपीएचएम सर्व्हिसेस यांनी इंडिया एंजल फंडच्या राऊंडमधून यशस्वीपणे बीज भांडवल उभारणी केली आहे. यातील बहुतेक महिला उद्योजिका आहेत आणि एंजलमध्ये त्यांनी प्रथमच गुंतवणूक केली आहे.

नवीन युगातील हीलिंग सहायक, आयपीएचएम सर्व्हिसेस (इंटिग‘ल पर्सनलाईज्ड हेल्थ केअर मॅनेजमेंट) मोठ्या संस्थांमधील व्यक्ती आणि कर्मचारी यांच्या मानसिक आरोग्यासाठी कार्यक्रम व वर्कशॉप तयार करते.

डॉ. सचिन भावसार यांनी स्थापन केलेल्या आयपीएचएमचा विश्वास आहे की, हृदय, शरीर, मन आणि आत्मा हे जीवनाचे चार स्तंभ आहेत आणि ते सर्व मिळून एक यंत्रणा तयार होते जिला सतत देखभालीची आवश्यकता असते. त्यांच्या सेवांचे उद्दिष्ट उत्तम आरोग्य, भावनिक आणि मानसिक स्वास्थ्य यांना अनुकूल व सुसंगत अशी कौशल्ये विकसित करून व्यक्तीस आपल्या संपूर्ण क्षमतांचा वापर करण्यास मदत करणे आहे.

निधीचा ओघ वाढल्यास, अधिकाधिक व्यक्ती, कर्मचारी आणि महत्त्वाकांक्षी उद्योजकांना प्रशिक्षण देऊन सर्वोच्च विकास साधला जाईल व एकूणच व्यक्तीची सृजनशीलता, उत्पादनक्षमता वाढेल. शेवटी सर्व गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या आहेत आणि कोणत्याही दिशेने सकारात्मक धक्का मिळाला असता, त्याचा फायदा आपण देत असलेल्या मूल्यांमध्ये वाढ होण्यासाठी होईल.

या निधीउभारणीबाबत बोलताना डॉ. सचिन भावसार, संस्थापक, आयपीएचएम सर्व्हिसेस, म्हणाले, ‘आम्ही जरी निरोगी जीवनाच्या चार गुणवैशिष्ट्यांच्या जोपासनेवर विश्वास ठेवत आलो असलो तरीही, रीअल टाईम सोल्यूशन्स आणि वेगाने प्रगती करणार्‍या आरोग्य यंत्रणेशी संबंधित तंत्रज्ञानाबाबत लोकांमध्ये फारच कमी जागृती दिसते. या ओघामुळे, तळागाळातील लोकांपर्यंत याचे ज्ञान पोहोचेल आणि त्यामुळे आरोग्याशी संबंधित अर्थव्यवस्थेमध्ये एकूणच सुधारणा होईल.‘

सदर विषयातील तज्ज्ञ आणि आयपीएचएम सर्व्हिसेसचा एक अविभाज्य भाग म्हणून, स्नेह कुलकर्णी, आयपीएचएम सर्व्हिसेसच्या सहसंस्थापिका म्हणाल्या, ‘मानसिक आरोग्याबाबतची जागरूकता आणि आरोग्य सेवा यंत्रणेमध्ये तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष वापर यात नेहमीच तफावत राहिली आहे.आता आपण एक जग झालो आहोत आणि आपण सगळे डिजिटली एकमेकांशी जोडलेले आहोत, त्यामुळे सामाजिक ताणाबाणा समूजन घेणे आणि सामाजिक-आर्थिक पार्श्वभूमी समजून घेण्यात मदत होते. यामुळे विविध संस्कृती आणि तेथील लोक यांना समजून घेता येते, त्यांना व्यक्तीगत मदत देता येते.‘

प्रथमच एंजल मध्ये गुंतवणूक करणार्‍या आयआयएम अहमदाबादच्या अल्मनी, मोनालिसा सरकार म्हणाल्या, ‘मी दिल्ली एनसीआरमध्ये विविध स्वयंसेवी संस्था आणि सरकारी संस्थांमध्ये सकि‘य कार्य केले आहे आणि मानसिक आरोग्याच्या अवकाशामध्ये अधिकाधिक स्टार्टअप्स येण्याच्या गरजेवर माझ्याएवढा भर कोणीच देऊ शकत नाही.‘

मला आणखी एका गोष्टीचा आनंद होतो की, डॉ. सचिन यांच्या सारख्या प्रेरणादायी व्यक्तीला ऊर्जेचे कोठार असलल्या स्नेह कुलकर्णी यांची जोड मिळाली आहे. तसेच मला सर्वात जास्त रोमांचक वाटते ती बाब म्हणजे या डीलचे नेतृत्व मी, ज्योती, कोयल यांसार‘या महिलांनी केले आहे. आणि आमच्यासोबत स्नेहसारखी एक महिला उद्योजिका आहे. मी नेहमीच म्हणते की, महिला एंजल्सनी सकि‘य पुढाकार घेऊन अन्य महिला उद्योजिकांना पाठबळ दिले पाहिजे.‘

महिला आता एंजल गुंतवणूकदार म्हणून आता प्रगती करत आहेत अणि आपली ऊर्जा, वेळ आणि पैसा यांची गुंतवणूक अशा क्षेत्रांमध्ये करत आहे जी फक्त वाढतच नाहीत तर राष्ट्राच्या आरोग्याचे मूल्यसंवर्धन करत आहेत.‘

या महिला उद्योजिकांबाबत बोलताना ज्योती तिवारी म्हणाल्या, ‘मी आरोग्य क्षेत्रात मागील 15 वर्षांहून अथिक काळ काम करत आहे आणि पूर्णपणे सहमत आहे की, मानसिक आरोग्य ही एकूणच आरोग्याची आणि तंदुरूस्तीची गुरूकिल्ली आहे. तसेच आपली रोगप्रतिकारक शक्ती मनावर काम केल्यानेच वाढते, फक्त शरीरावर उपचार करून नाही. मीदेखील प्रथमच एंजल गुंतवणूक करत आहे आणि मला या गोष्टीचा फार आनंद होतो की ह्या सहसंस्थापिका म्हणून स्नेह कुलकणीं सारख्या एक महिला आहेत तर त्यांना पाठिंबा द्यायला प्रेरणास्रोत डॉ. सचिन आहेत.‘

या प्रकल्पातील तिसऱ्या एंजल गुंतवणूकदार आहेत, 17+ वर्षांचा कॉर्पोरेट रिटेल क्षेत्रातील अनुभव असणाऱ्या आणि यशस्वीपणे स्वत:चा स्टार्टअप चालवणार्‍या सळसळत्या कोयल दत्ता. त्या म्हणतात, ‘17 वर्षांपेक्षा जास्त काळ व्यावसायिक म्हणून काम केल्यानंतर आणि यशस्वीपणे माझ्या अखेरच्या स्टार्टअपमधून-टायकार्टमधून बाहेर पडल्यानंतर, आता मी माझी पहिली एंजल गुंतवणूक करत आहे आणि मला खात्री आहे की, आम्ही चार महिला एंजल गुंतवणूकदार स्नेह यांच्या मार्गदर्शन व पालकत्वाखाली ही कंपनी उभारण्यासाठी काम करू शकू कारण मी यापूर्वीही एक यशस्वी स्टार्टअप चालवला आहे.‘

चौध्या महिला एंजल गुंतवणूकदार, सबाना खातून ज्या आयआयएम अहमदाबाद अल्मनीदेखील आहेत, एक उद्योजक महिला म्हणून त्यांच्याकडे अनेक कौशल्यं आहेत, ज्या टेडएक्सचौरंगी आणि विविध औद्योगिक नेटवर्क चालवण्यासह कोलकात्यामधील अनेक प्रकल्पांमध्ये कार्यरत आहेत, म्हणाल्या, ‘एकटी महिला उद्योजिका आणि मागील काही महिन्यांत मानसिक विकारांच्या अनेक केसेस स्वत: पाहिल्यानंतर माझी पहिली एंजल गुतंवणूक, ती देखील स्नेह कुलकर्णी आणि डॉ. सचिन यांच्यासोबत करताना मी रोमांचित झाले आहे.‘

‘एक डॉक्टर म्हणून मी सतत सांगत असतो की, मानसिक आरोग्याचं प्रकटीकरण शारीरिक आरोग्यात होतं आणि खासकरून अवघड काळात ते अधिक असतं. डॉ. सचिन यांच्या व्यक्तीगत जीवन सफरीबद्दल जाणून घेतल्यानंतर मी थक्क झालो. त्यांच्या अनेक सजर्र्री, विकलांगता आणि तरीही ते एवढे सकारात्मक आहेत. ते सर्वांसाठी एक आदर्श आहेत.

तसेच या टीममधील महिला जी सकारात्मक ऊर्जा घेऊन येतात ती मला अतिशय आवडते. माझी देखील ही पहिली एंजल गुंतवणूक आहे आणि मला या गोष्टीचा आनंद होतो की, ही गुंतवणूक अशा क्षेत्रात आहे जिथे स्वत: गुंतलेलो आहे.‘ डॉ. विकास ग्रोव्हर, एक डॉक्टर आणि स्टार्ट-अप समर्थक म्हणाले.

इंडिया एंजल नेटवर्कने आयपीएचएममध्ये रू. 25 लाखांच्या अतिरिक्त बीज भांडवल गुंतवणूक केली आहे. या डीलबाबत बोलताना राहुल नार्वेकर, संस्थापक आयएएफ म्हणाले,
‘मानसिक आरोग्य हा आता मुख्य प्रवाहातील अधिक जास्त चर्चेचा विषय बनला आहे, खासकरून सध्याच्या अस्थिर आणि भयाच्या वातावरणात किंवा एकूणच नकारात्मक वातावरणात हा विषय अधिक महत्त्वाचा झाला आहे. यामुळे एक वास्तव प्रकर्षानं सामोरं आलं आहे की, आपणाला याबाबत मोकळेपणाने बोलले पाहिजेच पण या समस्येला सामोरं जाऊन ती बरी केली पाहिजे.
मला स्नेह आणि डॉ. सचिन यांची ओळख राजीव दाभाडकर यांनी करून दिली आणि त्यांची समर्पित वृत्ती तसेच त्यांचे या क्षेत्रातील काम करण्याची सखोल निपुणता पाहुन मी चकित झालो. डॉ. सचिन यांचा व्यक्तीगत जीवनप्रवास म्हणजे जिद्द आणि दुर्दम्य निग्रह यांची कहाणी आहे आणि हेच कोणत्याही उद्योजकासाठी आवश्यक एक महत्त्वाचा गुण आहे.

यातील रोचक बाब ही आहे की, ये आता महिलांचे वर्चस्व असणारे डील झाले आहे. आमच्याकडे थक्क करणारी महिलांची बहुसंख्य आहे आणि मला खात्री आहे की, महिला या उत्कृष्ट सीईओ, उद्योजिका आणि एंजल गुंतवणूकदार असतात. महिला नेहमीच एका वेळी अनेक कामे करत असतात, त्या निसर्गत: अष्टावधानी असतात, सहजपणे गोष्टींची देवाणघेवाण करतात आणि निसर्गदत्त गुणांमुळे त्या अधिक चांगली काळजी घेऊ शकतात, नेमकं हेच मानसिक आरोग्य क्षेत्रात असणं गरजेचं आहे. तसेच सर्व चार एंजल गुंतवणूकदारांनी पहिल्यांदाच एंजल गुंतवणूक केली आहे आणि अधिकाधिक महिला जेव्हा एंजल गुंतवणूकदार होतील तेव्हा मला मनापासून आनंद होईल.‘
 
एंजल इंटिग्रेटेड पसर्नलाईज्ड हेल्थकेअर मॅनेजमेंट सर्व्हिसेस-परिचय: 

आयपीएचएम सर्व्हिसचे खास वैशिष्ट्य आहे ‘हृदय, शरीर, मन आणि आत्म्याच्या आरोग्याचे संवर्धन करणे. आयपीएचएमचा विश्वास आहे की, ही एक समेकित यंत्रणा आहे जी या चारही आधारांवर काम करते. यातील एकही आधार कोसळला तर जीवन असंतुलित होते. आयपीएचएम तणाव व्यवस्थापन, महिला आरोग्य, बालके आणि कुमार वयातील मानसशास्त्रविषयक सेवा देते.‘

समेकित एचआर हा इंटिग्रेटेड पसर्नलाईज्ड हेल्थकेअर मॅनेजमेंट द्वारे कॉर्पोरेट्सकरिता तयार केलेला एक कार्यक‘म आहे. आयपीएचएम संस्थेच्या मेनस्ट्रीम फक्शन्समध्ये विकसित होते, रिमोट वर्क क्रांती यापुढील संधींचे भाकीत करत आहे आणि ती इथे आता स्थिरावणार आहे. प्रत्येक संस्थेाला नवीन धोरणे ठरवावी लागतात आणि त्याचबरोबर आपल्या कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्याचीही संस्थांना तेवढीच काळजी घ्यावी लागते.
 
वेबसाईट: http://www.iphmservices.com/ 

माध्यम प्रश्नांसाठी संपर्क:
कोमल: [email protected]


Submit your press release

Copyright © 2024 Business Wire India. All Rights Reserved.