WHY US

Partner with us for Press release distribution and get best in class service, guaranteed postings on tier 1 media and maximum reach

यूएई-स्थित जेमिनी ग्रुपचे चेअरमन, सुधाकर राव यांच्यातर्फे एनआयटी वरंगळ या त्यांच्या माजी महाविद्यालयाला एक कोटी रुपयांची देणगी

  • Thursday, October 17, 2019 5:12PM IST (11:42AM GMT)
हा निधी अत्याधुनिक नाविन्यपूर्ण कल्पनांची मांडणी आणि विकास केंद्राकरिता वापरला जाईल
 
Warangal, Telangana, India:  यूएई-स्थित जेमिनी ग्रुपचे संस्थापक चेअरमन सुधारक राव यांनी आज एनआयटी, वरंगळ या आपल्या माजी महाविद्यालयाला एक अत्याधुनिक इनोवेशन आणि इनक्युबेशन केंद्र स्थापित करण्यासाठी एक कोटी रुपयांचे योगदान घोषित केले. एनआयटी वरंगळच्या हीरकमहोत्सव कार्यक्रमात श्री. राव यांच्या वतीने त्यांच्या मातोश्री गंगा राघवेंद्र राव आणि भगिनी सुजाता श्रीनिवासन राव यांनी यासाठीचा चेक महाविद्यालयाचे संचालक, प्रा. एनव्ही रमणा राव यांना सुपूर्त केला. यावेळी नॅशनल बोर्ड ऑफ अक्रेडिटेशनचे सन्माननीय चेअरमन प्रा. के. के. अगरवाल उपस्थित होते.
 
श्री. राव हे संस्थेचे माजी विद्यार्थी आहेत आणि १९७७-८२ या बॅचमध्ये त्यांनी इलेक्ट्रिकल इंजिनियरिंगची पदवी घेतली. ते मध्यपूर्वेतील सर्वात मोठ्या व्यवसाय समूहांपैकी एक असलेल्या जेमिनी ग्रुपचे संस्थापक आहेत. हा समूह रियल इस्टेट, ऊर्जा व्यापार आणि संपत्ती व्यवस्थापन क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे. एक विवेकशील उद्योजक असलेले श्री. राव हे भारत आणि मध्यपूर्वेतील राष्ट्रे अशा दोन्ही ठिकाणी शिक्षण आणि समाजकल्याण क्षेत्रातील मोठ्या कार्यक्रमांना सहाय्य करत असतात.
 
या देणगीबद्दल बोलताना जेमिनी ग्रुपचे संस्थापक चेअरमन सुधाकर राव म्हणाले, “माझ्या माजी महाविद्यालयाचे माझ्यावर जे प्रचंड मोठे ऋण आहे, त्यातून उतराई होण्याची माझी दीर्घ काळापासून इच्छा होती, ती मी पूर्ण करत आहे. एनआयटी वरंगळ मध्ये मला केवळ प्रतिष्ठित पदवीच मिळाली असे नाही तर माझ्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्यासाठीचा आत्मविश्वासही मिळाला, याचा मला मोठा अभिमान आहे.”
 
श्री. राव यांच्या देणगीचा उपयोग संस्थेमध्ये अत्याधुनिक इनोवेशन आणि इनक्युबेशन केंद्र स्थापन करण्यासाठी केला जाईल. “मला आशा आहे की हा हॉल विद्यार्थ्यांच्या पुढच्या पिढीच्या स्वप्नांना बळ पुरवेल; तरुण मनांमध्ये उद्योजक बनण्याचे स्वप्न रुजवेल आणि एका उत्कट भवितव्यासाठी त्यांना पंख देईल,” असेही श्री. राव म्हणाले.
 
जेमिनी ग्रुप बद्दल

जेमिनी प्रॉपर्टी डेव्हलपर्स हे मध्य पूर्व आणि भारतातील प्रसिद्ध व्यवसाय समूहांपैकी एक असून ते रियल इस्टेट विकासाच्या व्यवसायात आहेत. त्यांना ३० वर्षांहून अधिक यशस्वी व्यवसायाचा अनुभव आहे आणि अत्युच्च दर्जा टिकवून ठेवणाऱ्या अत्याधुनिक तरीही परवडणाऱ्या किंमतीतील लक्झरी प्रॉपर्टी विकसित करण्याची त्यांच्या योजना आहेत.
 
लीगसी फिनवेस्ट प्रा. लि. ही एक बूटिक संपत्ती व्यवस्थापन कंपनी आहे जिची भारतभर कार्यालये असून ती संपत्ती सल्लागार आणि कौटुंबिक कार्यालय सेवा पुरवते.
 
Photos/Multimedia Gallery Available: https://www.businesswire.com/news/home/52110415/en

संपर्क:
पुर्ण नाव: अजय बजाज
दूरध्वनी: + ९१० ९९२०९ २८७५८
ई-मेल: [email protected]


Submit your press release

Copyright © 2025 Business Wire India. All Rights Reserved.